Good News – राज्यात 40 हजार शिक्षकांची होणार भारती, वाचा काय आहे नियोजन
मुंबई : तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ठाकरे सरकारने राज्यातील 40 हजार शिक्षकांच्या भरातीचा निर्णय घेतला आहे. यासाठी आवश्यक असणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान दोन टप्प्यात घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार असून पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत.
दरम्यान, यापूर्वी टीईटी परीक्षा दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2018-19 मध्ये घेण्यात आली होती. कोरोना विषाणू संसर्गाच्या कारणामुळे ही परीक्षा दोन वर्ष लांबणीवर पडली होती.
पहिल्या टप्प्यात शिक्षकांच्या 6100 जागा भरणार
