बँक ऑफ बडोदाचा ११४ वा वर्धापनदिवस साध्या पद्धतीने साजरा
पुणे : कोरोनाच्या संकटाला पाहता थोडक्यात व साध्या पद्धतीने बँक ऑफ बडोदाचा ११४ वा वर्धापनदिवस साजरा करण्यात आला. आजच्या खास दिनानिमित्त पुण्यातील लक्ष्मी रोडवर असलेल्या शाखेला सजवण्यात आले होते; बँकेचे संस्थापक स्वर्गीय सयाजीराव गायकवाड यांच्या फोटो स्मृतीला अभिवादन करण्यात आले तसेच बँकेच्या ११४ व्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला.
आजच्या वर्धापनदिनाच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हर्षा शहा, व्यवसाय मार्गदर्शक एस. एस सावंत, लक्ष्मी रोड शाखा बँक मॅनेजर मंगेश कुलकर्णी, नामदेवराव आयवळे, बँक मित्र रोहन देशपांडे, शाखेतील सर्व कर्मचारीवर्ग, खातेदार व इतर हितचिंतक उपस्थित होते.
स्वर्गीय सयाजीराव गायकवाड यांनी इसवी सन १९०८ मध्ये २० जुलै रोजी बँक ऑफ बडोदाची स्थापना केली होती. ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे, १९६९ साली बँकेचे राष्ट्रीयीकरण झालेले तेव्हा बँक ऑफ बडोदा ही त्यातील एक बँक होती. आज बँकेच्या माध्यमातून जनहितार्थ अनेक योजना राबविल्या जातात. आधुनिक काळातील मोबाईल बँकिंगची सुविधा, डोअर सेवा देखील बँकेमार्फत राबविण्यात येते अशी माहिती मॅनेजर मंगेश कुलकर्णी यांनी दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शंकर कोतले यांनी तर आभार कुलकर्णी यांनी मानले.
