आयआयटी जेईई आणि नीट ऑनलाईन अभ्याक्रम आता टाटा स्कायवर उपलब्ध
पुणे : टाटा स्काय या भारतातील आघाडीच्या कंटेंट डिस्ट्रिब्युशन आणि पे टीव्ही व्यासपीठाने वेदांतू या लाईव्ह ऑनलाइन लर्निंगमधील संस्थेच्या साह्याने आज एका नाविन्यपूर्ण भागीदारीची घोषणा केली आहे. यातून भारतभरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिले जाणार आहे .खर्च, अंतर आणि वेळ अशा शिक्षण घेण्यातील सर्वसाधारण अडचणी दूर करत या व्यासपीठावर टाटा स्काय जेईई प्रेप आणि टाटा स्काय नीट प्रेप या लिनिअर सेवा सादर करण्यात आल्या आहेत. यात ९ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना फाऊंडेशन पातळीची तयारी आणि ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना जेईई मेन, जेईई अँडव्हान्स आणि नीट या कोअर सिलॅबसची तयारी करण्यासाठी साह्य केले जाईल.
दररोज ५ रुपयेअशा परवडणाऱ्या दरात सर्वोत्कृष्ट वेदांतूच्या मास्टर टीचर्सकडून हा अभ्यास शिकवला जईल. यात इंग्रजी आणि हिंदी अशा एकत्रित स्वरुपात शिकवले जाणार आहे . कंटेंट सहज उपलब्ध व्हावा यासाठी ही सेवा टाटा स्काय मोबाइल अँपवरही उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना बिंज पद्धतीने हवे तेव्हा शिकता येईल, तसेच बॅच देखील रिपीट करता येणार आहे; आणि सिलॅबस रिव्हिजन, परीक्षा, क्लास नोट असा सगळा कंटेट ऑन–डिमांड उपलब्ध होईल. या सेवेत उपलब्ध परीक्षा तयारीसाठीचे मटेरिअल ही अँपच्या माध्यमातून मिळवता येईल. ५१८ वर टाटा स्काय नीट मिळवण्यासाठी ८८९१०८८९१० आणि ५१७ वर टाटा स्काय जेईई प्रेप मिळवण्यासाठी सबस्क्राईबर्सना ८४६००४८४६०४ या नंबर वर मिस्ड कॉल देता येईल.
टाटा स्कायच्या चीफ कमर्शिअल अँड कंटेंट ऑफिसर पल्लवी पुरी म्हणाल्या, टीव्हीच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण पुरवल्याने अधिकाधिक महत्त्वाकांक्षी व्यक्तींना फायदा होईलच पण त्याचबरोबर छोटी शहरे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या ब्रॉडबँडच्या समस्येवरही तोडगा मिळेल. वेदांतूच्या साह्याने आम्ही विविध पार्श्वभूमी असलेल्या, विविध क्षमता आणि शैक्षणिक प्राधान्य असलेल्या बहुविध लोकसंख्येला कोर्स मटेरिअल, स्रोत, दर्जेदार शिक्षक उपलब्ध करून देत आहोत.
वेदांतूचे सीओओ अरविंद सिंघल म्हणाले, ३० लाखांहून अधिक विद्यार्थी आणि परीक्षांची तयारी करणाऱ्यांना दरमहा वेदांतूच्या लाईव्ह लर्निंगचा फायदा मिळणार आहे. प्रत्येक घरात परवडणाऱ्या दरात दर्जेदार शिक्षण पोहोचवण्याच्या आमच्या प्रवासात ही भागदारी म्हणजे एक पुढचे पाऊल आहे
