PMP प्रशासनाकडून वाहकांना नियुक्ती देण्यास टाळाटाळ – राकेश पवार
पुणे: पीएमपी जाहिरात क्र.42. 30/12/2016 रोजीच्या वाहक पदे -4900 गेल्या पाच वर्षापासून भरती प्रलंबित आहेत. दि.६ मार्च २०२० रोजी १७८४ जागेसाठी ७१३६ पदांची निवड यादी तयार झाली, मात्र लाॕकडाऊन व कोरोनामुळे नियुक्ती थांबली. त्यानंतर PMPML अधिकाऱ्यांनी लेखी स्वरुपात पत्र दिले की मार्च २०२० पर्यंत सर्व ४९०० पदे पुर्ण भरली जातील व नवीन जाहिरात काढणार नाही तरीसुध्दा प्रशासन नियुक्ती देण्यास टाळाटाळ करत आहे अशी माहिती छात्रभारतीचे महाराष्ट्र अध्यक्ष राकेश पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दि. २४ जून २०२१ पासून संपूर्ण महाराष्ट्रातील वाहक पदांचे उमेदवार गेली २५ दिवसांपासून घंटानाद – ठिय्या आंदोलन करत आहेत. तरी अद्यापही प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. महाराष्ट्रातील हजारो तरुण गेल्या पाच वर्षापासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत यामुळे उमेदवारांसह त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. PMPML प्रशासन कुणाच्या आत्महत्येची वाट पाहतय का ? एखादा स्वप्निल लोणकर सारखा बळी PMPML ला घ्यायचा आहे का ? असे राकेश पवार म्हणाले.
