Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

RTE मध्ये होत असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी लाच लुचपत विभागाने केली कारवाई

पुणे: RTE (right to eduction अर्थात शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 अनव्ये राज्यात प्रवेश प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये अनागोंदी व गोंधळ मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे आहे याबाबत शिक्षण विभागाला आम्ही वेळोवेळी सांगून व अर्ज देऊन देखील त्याची दखल घेतली नव्हती .आमच्या संस्थेच्या पालक सदऱ्या कामिनी ओवाळ यांनी
आम्हाला कॉल करून कळवले की ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल बाणेर येथे माझ्या मुलीच्या शाळेत नंबर लागला आहे मात्र तेथील अधिकारी कागदपत्रे अपुरी आहेत. या कारणाने आम्हाला पैशाची मागणी करत आहेत त्यानुसार आम्ही त्यांना लाल लु च पट विभागाकडे तक्रार दाखल करण्यास सांगितले व तेथील अधिकाऱ्यांनी तक्रारीची शहानिशा करून सापळा
रचत दि 16 जुलै रोजी पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे सहा प्रशासकीय अधिकारी व शिवाजी बोखरे यांना रंगेहात पकडले.


अशी माहिती आर टी कृती समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बाबा आकाडे यांनी दिली.
बाबा आकाडे म्हणाले असे अनेक पालक आहेत ज्यांनी तक्रार देण्याची हिम्मत केले नाही मात्र त्यांची
देखील अडवणूक करून प्रवेश नाकारले गेले आहेत.rte पोर्टल व ही प्रवेश प्रक्रिया नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते.
त्यावर आम्ही खालील मुद्दे उपस्थित करत आहोत. 


1)rte पोर्टल मध्ये जे बदल झाले आहेत त्यात एप्लीकेशन डिटेल्स लपवले आहेत हे कोणाच्या सांगण्यावरून केल्यात शिक्षण विभागातील अधिकारी व एन आय सी चे संबंध आहेत का?
2)rte पोर्टल वर पडताळणी समितीची यादी प्रसारित केली होती ते त्यावरून का हठवली गेली
3) खाजगी शाळा rte प्रवेश न करत आहेत त्यांच्यावर कारवाई का होत नाही?
4) नमूद केलेल्या कागदपत्रांच्या पेक्षा जास्त कागदपत्रांची मागणी का केली जाते.
5) पॅन कार्डची आवश्यक नसताना पण कार्ड मागून बँक बॅलन्स चेक करण्याचा अधिकार शाळा पडताळणी समिती व प्रशासकीय अधिकारी यांना कोणी दिले?
6) प्रशासकीय अधिकाऱ्यांना गट शिक्षण अधिकाऱ्यांनी स्टेटस अपडेट केलं नंतर परत बदल का करता येत आहे त्यांना मुभा का दिली गेलीआहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading