विश्वकर्मा प्रतिष्ठानचे निळू फुले स्मृती पुरस्कार प्रदान

पुणे : विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक काम करणाऱ्या समाजसेवकांना दरवर्षीप्रमाणे विश्वकर्मा प्रतिष्ठान च्या वतीने सिनेअभिनेते स्वर्गीय निळू फुले यांच्या स्मरणार्थ निळू फुले स्मृती पुरस्कार तसेच निळू फुले स्मृती गौरव रत्न पुरस्कार बहाल करण्यात आली.

ज्येष्ठ पत्रकार, लेखक श्याम दौंडकर, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रसाद खंडागळे, माजी क्रिकेट रणजीपटू प्रसाद ओक यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. पुरस्कार मिळालेल्यात साहित्यिक राजेंद्र कुंभार, चित्रपट निर्माते कुंडलिक केदारी, पत्रकार सुनील माने, सामाजिक कार्यकर्त्या रुक्मिणी नागापुरे, सुनील कांबळे, चंद्रकांत पवळे यांचा समावेश आहे. यावेळी विश्वकर्मा प्रतिष्ठान चे अध्यक्ष विष्णू गरुड, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार जाधव, दिगंबर लोहार, चंद्रकांत गवळी, प्रमोद सूर्यवंशी, अनिल सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे महानगरपालिकेच्या वतीने सिनेअभिनेते स्वर्गीय निळू फुले स्मृती पुरस्कार दरवर्षी सुरू करावा अशी मागणी विश्वकर्मा प्रतिष्ठान चे अध्यक्ष विष्णू गरुड यांनी यावेळी केली.

Leave a Reply

%d bloggers like this: