Saturday, September 5, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कोरोना – तिसऱ्या लाटेत ६० लाख रुग्ण बाधित होणार – आरोग्य मंत्री राजेश टोपे

जालना : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका टळलेला नाही. जर कोरोनाची तिसरी लाट पसरली तर जवळपास ६० लाख व्यक्ती बाधित होण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरला असला, तरी तिसऱ्या लाटेची लक्षणं दिसायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांत वाढत असल्याचं चित्र आहे. हे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत नसलं, तरी तिसऱ्या लाटेची शक्यता फेटाळून लावता येऊ शकत नाही. पहिल्या लाटेत 20 लाख लोक बाधित झाले होते. दुसऱ्या लाटेत 40 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेत साधारण 60 लाख नागरिकांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता आहे, असा अंदाज टोपे यांनी व्यक्त केला आहे. जालन्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा अंदाज व्यक्त केला.

4000 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज
कोरोनाची तिसरी लाट जर आली, तर राज्याला सुमारे 4 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज निर्माण होऊ शकते, असा अंदाजही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. दुसऱ्या लाटेत एकूण 1700 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागली होती. मात्र तिसऱ्या लाटेत जर बाधितांची संख्या जर 60 लाखांवर गेली, तर निश्चितपणे 4 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading