Monday, June 22, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

आषाढी वारी – तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

देहू : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुका एसटीच्या शिवशाही बसने सोमवारी पंढरपूर च्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. १ जुलै रोजी तुकोबांचा पालखी सोहळा मुख्य मंदिरात पार पडला होता. दरम्यान, करोनाचं संकट असल्याने यावर्षी देखील पालखी मुख्य मंदिरात विसावल्या होत्या. तर, आज शिवशाहीमधून ग्यानबा तुकाराम म्हणत टाळ मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत.

“१ जुलै पासून देहूच्या मुख्य मंदिरात गोल रिंगण, मेंढ्यांच रिंगण, अश्वाच रिंगण असे सोहळे पार पडले आहेत. हे सर्व सोहळे दरवर्षी पंढरपूरच्या दिशेने पायी वारी जाते तेव्हा पार पडत असतात. परंतु, यावर्षी देखील करोनाचं संकट असल्याने मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे.

आज सकाळी मुख्य मंदिरात प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखी इनामदार वाड्यात टाळ मृदंगाच्या गजरात पोहचली. तिथे पादुकांची आरती करून झाल्यानंतर एसटीमध्ये पादुका विसावल्या. तुकोबांचा जयघोष करत ग्यानबा तुकारामाने परिसर दुमदुमून गेला होता. एसटीमधून पादुका पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading