वारजे पोलिसांचा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान
पुणे: संत रविदास चर्मकार युवा फाउंडेशन महासंघ वारजे विभाग सर्व पदाधिकारी, वरिष्ठ मान्यवर यांच्या उपस्थितीत, वारजे पोलीस ठाणे मधील आमचे रक्षक पोलीस बंधू -भगिनीं यांनी कोरोना काळात स्वतःच्या कुटुंबाची आपल्या मुला-बाळांची स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, ज्यांनी दिवस -रात्र मानवता धर्म पाळून समाजाला सुरक्षित ठेवले व आपले कर्तव्य बजावले अशा शूर कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी अंमलदार बांधवाना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन संन्मानित करण्यात आले.
त्या कार्यक्रमास उपस्थितीत पोलीस बंधू -भगिनी सत्कार मूर्ती असे आहेत, PSI .रामेश्वर कामशेट्टे, वरिष्ठ पो. निरीक्षक गुलाब पाटील, .चंद्रकांत लोंढे , प्रिया जगताप, कविता भालेराव, खंडेराव भते, आसिफ मनुरे , बाळा वाळुंज , प्रदीप दाभाडे, दिपक पवार, शेंडगे साहेब, प्रवीण लोकरे यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन संन्मानित करण्यात आले तसेच या कार्यक्रमाला संत रविदास चर्मकार युवा फाउंडेशन महासंघ चे सर्व वरिष्ठ पदाधिकारी व वारजे विभाग कार्यकारणी, पदाधिकारी उपस्थित होते.
