RRR – आलिया भटच्या एका गाण्यावर होणार ‘इतके’ कोटी खर्च
दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या “आरआरआर’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आपल्या चित्रपटात भव्यदिव्य करण्याकडे राजामौली यांचा नेहमीच कल असतो. त्याचप्रमाणे त्यांनी “आरआरआर’मध्येही काही भव्यदिव्य करायला सुरुवात केली आहे. या चित्रपटाचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले आहे. आलिया भट आणि रामचरण यांच्यावर एक गाणं चित्रित होणार असून या एका गाण्यासाठी राजामौलींनी प्रचंड खर्च केला आहे..
अलियाच्या या गाण्यावर थोडेथोडके नव्हे तर तब्बल 3 कोटी रुपये खर्च होणार असल्याचे समजले. या गाण्याच्या शूटिंगसाठी आलिया भट या महिन्यात हैदराबादला पोहोचणार आहे. गाण्यासाठी रामोजी फिल्मसिटीमध्ये विशाल सेट उभारला जाणार आहे. याची भव्यता प्रत्यक्ष पडद्यावर अधिकच भव्य दिसणार आहे. “आरआरआर’ दसऱ्याच्या मुहुर्तावर रिलीज करण्याचे नियोजन आहे. 13 ऑक्टोबरला सिनेमा रिलीज करावा असे आता तरी ठरवले आहे.
