केक प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन पाच दिवस, २०१ महिलांना प्रशिक्षण

पुणे : कलाप्रसाद मंगल कार्यालय ,सदाशिव पेठ येथे भारतीय जनता पार्टी पुणे शहर , द हिंदू फाउंडेशन , स्कील्लेट्झ फाउंडेशन आणि श्री समर्थ बचत गट यांच्या वतीने डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती आणि स्व. रामभाऊ म्हाळगी यांच्या जयंती शताब्दी वर्षानिमित्त केक प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन भारतीय जनता पार्टी पुणे शहर ओ बी सि आघाडी चे अध्यक्ष योगेश पिंगळे आणि भाजपा पुणे शहर व्यापारीआघाडीचे अध्यक्ष महेंद्र व्यास आणि भाजपा पुणे शहर प्रवक्ता आणि उपाध्यक्ष धनंजय विष्णू यांच्या यांच्या हस्ते झाले .

 

यावेळी धनंजय जाधव म्हणाले की, कोरोनाच्या या महामारीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे छोटे , मोठे व्यवसाय, रोजगार बुडाले, पगार बंद झाले . याच दरम्यान कित्येकांच्या घरातील करती माणसे मरण पावली, कित्येक जण अनाथ झाले ,त्यामुळे आणि कित्येक लोकांच्या समोर जगण्यासाठी घरात बसून स्वयंरोजगार मिळवण्याचा आणि करण्याचा पर्याय उभा राहिला, त्यामुळे महिलांना घरच्या घरी उद्योग आणि स्वयंरोजगार निर्माण कसा करता येईल तसेच महिलांनी जास्तीत जास्त संख्येने अशा स्वयंरोजगार निर्मिती साठी पुढे यावे, आणि याच विचारातून केक प्रशिक्षण स्वयंरोजगार प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे.

योगेश पिंगळे म्हणाले , कोरोनाच्या या सर्व काळात भाजपचा कार्यकर्ता हा जनतेच्या मदतीसाठी रोडवर उतरला होता , आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने महिलांना केक प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करून महिलांना रोजगार निर्माण करून देण्याचा उपक्रम नक्किच स्तुथ्य उपक्रम आहे. त्यामुळे महिलांनी या उपक्रमातून व्यावसायिक व्हावे. भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष महेंद्र व्यास म्हणाले की, भाजप व्यापारी आघाडीच्या वतीने या उपक्रमाला जी जी मदत लागेल ती आम्ही करू, आणि महिलांना स्वयंरोजगार मिळवण्यासाठी सहकार्य करू.

यावेळी चार्टर्ड अकौटंट सोनाली सारीपल्ली, आणि डॉ. श्रुती कलारन्स यांचेही यावेळी भाषणं झाली. तर ओंकार माळवदकर,   कांचन कुंबरे, दादरा नगर हवेली स्वातंत्र्य संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक अरविंद मनोलकर, विशाल पवार, अमित कंक,  अंकुश नवले, डॉ. मिताली मोरे, डॉ. श्रुती क्लारन्स हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे  धनंजय विष्णू जाधव , स्किल्लेट्झ फाउंडेशन च्या सोनाली सारीपल्ली, स्वामिनी बचत गटाच्या सीमा शिंदे, आणि श्री समर्थ बचत गटाच्या वनीता सोपे यांनी केले. सूत्रसंचालन नम्रता कामत यांनी तर आभार प्रदर्शन रवींद्र कांबळे यांनी मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: