fbpx
Saturday, April 27, 2024
ENTERTAINMENTLatest News

फरहान अख्‍तर, मृणाल ठाकूर आणि राकेश ओमप्रकाश मेहराने पुण्‍यामध्‍ये आणला ‘तूफान’

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर चित्रपट ‘तूफान’ सुरू होण्‍यापूर्वी तूफानी टीम – फरहान अख्‍तर, मृणाल ठाकूर व राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी आज अद्वितीय व्‍हर्च्‍युअल शहरी दौ-याच्‍या माध्‍यमातून पुण्‍याला भेट दिली. 

अभिनेता व सह-निर्माता फरहान अख्‍तर ‘तूफान’साठी व्‍हर्च्‍युअल शहर भेटीसाठी उत्‍सुक होते, ते म्‍हणाले, ”पुणे हे इतर प्रत्‍येक शहराप्रमाणे उत्तम संस्‍कृती व प्रेरणादायी कथांचे स्‍थान आहे. हे देशातील काही प्रख्‍यात क्रीडा व्‍यक्तिमत्त्वांचे घर आहे आणि आपल्‍याला त्‍यांच्‍या योगदानाचा अभिमान वाटतो. निर्माता व अभिनेता म्‍हणून मला पुण्‍यामधील स्‍थानिक मीडियासोबत गप्‍पागोष्‍टी करण्‍याची आणि ‘तूफान’च्‍या प्रबळ व प्रेरणादायी कथेबाबत सांगण्‍याची संधी मिळाल्‍याने खूप आनंद होत आहे. अनेक वर्षांपासून या शहराने मला दिलेले प्रेम व पाठिंबा पाहून मी खूप भारावून गेलो आहे.” चित्रपटामधील भूमिकेबाबत सांगताना ते म्‍हणाले, ”चित्रपट ‘तूफान’सह मला समजले आहे की, शारीरिकदृष्‍ट्या कितीही प्रबळ असले तरी बॉक्‍सरच्‍या जीवनात सामावून जाणे पूर्णत: नवीन अनुभव आहे. मी भूमिकेसाठी शारीरिकदृष्‍ट्या व मानसिकदृष्‍ट्या तयार असण्‍यासाठी दररोज ८ ते ९ तास प्रखर प्रशिक्षण घेतले. ही भूमिका व कथा माझ्या मनाच्‍या खूप जवळ आहे आणि आशा करतो की, प्रेक्षकांना ही भूमिका आवडेल.”

अभिनेत्री मृणाल ठाकूर म्‍हणाली, ”रिंगणामध्‍ये असलेल्‍या प्रत्‍येक पुरूषाला महिलेचा पाठिंबा असतो. माझी भूमिका अनन्‍या अज्‍जू भाईला अझिझमध्‍ये रूपांतरित करण्‍याच्‍या संपूर्ण प्रवासामध्‍ये उत्‍प्रेरकाची भूमिका बजावते. या भूमिकेला इतरांपेक्षा वरचढ ठरवणारी बाब म्‍हणजे ती आत्‍मविश्‍वासू, दयाळू व उदारमतवादी मुलगी आहे.”

दिग्‍दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा म्‍हणाले, ”चित्रपट ‘तूफान’ची कथा एका व्‍यक्‍तीला सामना कराव्‍या लागणा-या आव्‍हानांबाबत आणि असे असताना देखील कधीच हार न मानण्‍याच्‍या वृत्तीबाबत आहे. हा मनोरंजनपूर्ण, तसेच रोमांचक, विचारशील व प्रेरणादायी चित्रपट आहे. तर मग कॅलेंडरवरील तारखेवर खूण करून ठेवा आणि पॉपकॉर्न तयार ठेवत हा मनोरंजनपूर्ण चित्रपट पाहण्‍याचा आनंद घेण्‍यासाठी सज्‍ज राहा.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading