Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

महामाता रमामाईच्या चरणी सर्वधर्मीय साकडे

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड . प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीत गतीने सुधार होण्यासाठी आज महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मारका जवळ सर्वधर्मीय साकडे घालण्यात आले. बाळासाहेबांची प्रकृती आता स्थिर असून ती सुधारत देखील आहे, ती प्रकृती अधिक गतीने सुधरावी यासाठी सर्वधर्मीय साकडे आज बाळासाहेबांच्या आजी महामाता रमामाई आंबेडकर यांच्या चरणी घालण्यात आले. महामाता रमामाई भीमराव आंबेडकर स्मारकच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, संयोजक विठ्ठल गायकवाड , वंचित बहुजन आघाडीचे समाज माध्यम प्रसिद्धि प्रमुख राहूल चांदेकर, शिख धर्माचे प्रतिनिधी भोलासिंग आरोरा, बौद्ध धर्माचे प्रतिनिधी भन्ते धम्मानंद, मुस्लिम धर्माचे प्रतिनिधी आदिल सैय्यद, हिंन्दू धर्माचे प्रतिनिधी पंडित विवेक गायकवाड आणि ख्रिश्चन धर्माचे प्रतिनिधी रेव्हरेंड प्रशांत ख्रिस्ती उपस्थित होते.
रमाई महोत्यावाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर त्यांच्या मनोगतात म्हणाले , बाळासाहेबांची आणि माझे अनेक वर्षांचे संबंध असून बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या मार्गावर चालणारा सच्चे नेतृत्व असे बाळासाहेबांचे वर्णन करता येईल. सर्व जाती-पातींच्या पलिकडे जाऊन बाळासाहेबांनी त्यांचे कार्य उभे केले व ते विस्तारले. भारतीय राजकारणात असलेल्या मोजक्या अभ्यासू राजकारण्यांमध्ये बाळासाहेबांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.ते पेशाने वकिल असल्याने त्यांनी सातत्याने कायद्याच्या चौकटीत राहूनच त्यांचे विचार आणि त्यांची भुमिका मांडली. सर्व धर्मियांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असून त्यांना मानणारा मोठा वर्ग समाजात दिसून येतो.

कार्यक्रमास उपस्थित विविधधर्मी प्रतिनिधींनी थोडक्यात मनोगते व्यक्त केली .
संयोजक विठ्ठल गायकवाड यांनी भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना वाचून कार्यक्रमास प्रारंभ केला . गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तर वंचित बहुजन आघाडीचे समाज माध्यम प्रसिद्धि प्रमुख राहूल चांदेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading