Saturday, June 13, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

मुंबईच्या सुमद्राचे खारट पाणी गोड करण्याची राज्य सरकारला गरज काय- कर्नल सुरेश पाटील

पुणे : मुंबई मालाड भागामध्ये इत्रायलच्या मदतीने
सुमद्रातल्या पाण्याचा खारटपणा काढून टाकून ते पाणी पिण्यालायक बनविण्यासाठी मोठा प्रकल्प
उभारला जात आहे.त्यामुळे मुंबईकरांना कधीही पा ण्याची टंचाई भासनार नाही असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे प्रकल्प जगभरात अनेक आहेत त्याचे पर्यावरणावर काय दुष्परिणाम होणार आहे हे  पाहणे ही अत्यंत महत्त्वाचे आहे. समुद्राचे खारट पाणी प्रकल्प उभारणे म्हणजे काही गोष्टींचा विचार करावा लागेल. त्यासाठी लागणारी ऊर्जा, खर्च तसेच महत्त्वाचे त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम दहा वर्षापासून समुद्राचे खारे पाणी गोड करण्याचा प्रकल्प राबविण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.

अशी माहिती ग्रीन थंब पर्यावरण संस्था महाराष्ट्र राज्य चे  अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला कर्नल लक्ष्मण साठे ,फिरोज मुल्ला, गोसीया खान उपस्थित होते .
कर्नल पाटील म्हणाले परंतु लागणारा भरपूर खर्च असल्यामुळे मलाड मनोरी येथे प्रकल्प उभा करण्यासाठी रुपये 1600 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे व पुढे वीस वर्षे प्रकल्प चालू राहण्यासाठी रुपये 1920 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.मुंबईच्या मालाड भागात सुमद्राचे खारट पाणी गोड करण्याची राज्य सरकारला गरज काय ?
तसेच समुद्रातील पाणी काढून टाकण्याच्या प्रक्रियेत खूप कचराही तयार होतो पाण्यातून वेगळे काढलेले अवशेष खारटपणा याचं काय करायच आता प्रश्‍न निर्माण होतो? असाही प्रश्न कर्नल पाटील यांनी उपस्थित केला
ते पुढे म्हणाले हा कचरा पुन्हा समुद्रात सोडलं राहतो त्यामुळे आसपासच्या पर्यावरणात खूप दुष्परिणाम होतात याचा विचार राज्य सरकारने केला पाहिजे.

मुंबई होणारी 90 कोटी लिटर पाण्याची गळती तर 20 कोटी लिटरचा  प्रकल्प उभारायची गरज काय? असाही प्रश्न कर्नल पाटील यांनी उपस्थित केला. प्रचंड खर्च वाया जाण्याची शंका आहे. तुझा पहिला जर गेलो तर महाराष्ट्र राज्यामध्ये खेडोपाडी गावांमध्ये शहरा लगतच्या गावांमध्ये आजही पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. त्यांना आपण टँकरने पाणीपुरवठा करत असतो तेही पूर्ण नाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फक्त मुंबई  पुरतीच  नाही संपूर्ण महाराष्ट्रात भेडसावणारी समस्या आहे शेती जगविण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्याची वाट पाहावी लागत आहे गुजराती सरकार महाराष्ट्रातील धरणा वर  का  लक्ष घालत नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading