fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

UT No 1 – देशातील 13 राज्यांमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरले अव्वल

पुणे: प्रश्नम या संस्थेने आपल्या त्रेमासिक अहवाल नुकताच जाहीर केला आहे त्यामध्ये देशातील ते राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही नंबर वन ठरले आहेत द प्रिंट ने या संदर्भात वृत्त दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रभरातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रश्नमने घेतलेल्या सर्वेक्षणात 13 राज्यात मिळून
एकूण 17500 जणांनी आपले मत नोंदवले महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्वेक्षण सर्वात मोठया सर्वेक्षणा पैकी एक असल्याचा दावा केला जात आहे दरम्यानच्या सर्वेक्षणात तीन पर्याय देण्यात आले होते.


1) मुख्यमंत्र्यांची कामगिरी खराब असून ते पुन्हा मुख्यमंत्री म्हणून नको
2) मुख्यमंत्र्यांनी कामगिरी चांगली असली तरी पुन्हा त्यांना मत देणार नाही
3) मुख्यमंत्र्यांची कामगिरी चांगली असून पुन्हा तेच मुख्यमंत्री हवे
या सर्वेक्षणात सर्वाधिक पसंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. 49% मतदारांनी उद्धव ठाकरे यांची कामगिरी चांगली असल्याचे मत नोंदवले आहे.

प्रश्नमकडून देशातील तेरा राज्य निवडण्यात आली होती त्यात बिहार ,गोवा ,गुजरात हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र ,पंजाब, मध्य प्रदेश ,राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश, आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे.
या तेरा राज्यांमध्ये देशातील एकूण लोकसंख्येच्या 67 टक्के लोक राहतात या सर्वेक्षणात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या तामिळनाडू केरळ पश्चिम बंगाल ,आणि आसामचा समावेश नाही
तर आंध्र प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड ,आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये पॅनल नसल्यामुळे या राज्यांचाही सर्वेक्षणात समावेश करता आला नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading