अमेरिकेने आपल्या सैनिकांसाठी तयार केली खास वृद्धत्व न येणारी गोळी

नवी दिल्ली: अमेरिकेने आपल्या जवानांचे वय वाढून वृद्धत्व येऊ नये, त्यांची कार्यक्षमता वाढावी, गंभीर जखमा तत्काळ भरल्या जाव्यात म्हणून खास अॅण्टी एजिंग गोळी तयार केली आहे. त्याच्या सध्या चाचण्या सुरू आहेत. अमेरिकेच्या स्पेशल ऑपरेशन कमांडने ही गोळी बनवली आहे.

जवानांची क्षमता वाढवण्यासाठी अमेरिकन संरक्षण मंत्रालय पेंटागॉन प्रोजेक्टवर काम करत आहे. त्यानुसार जवानांच्या शरीरातील निकोटीनामाईन एडेनीन डायन्युक्लिओटाईडचा स्तर वाढवला जाणार आहे. जवानांसाठी तयार केलेल्या खास गोळीत खाद्यपदार्थ, डेअरी उत्पादनातून काढलेल्या न्यूट्रास्युटिकल्सची मात्रा चांगली असणार आहे. ही गोळी सूज आणि नुरोडिजनरेशन म्हणजे नर्व्हस सिस्टमचे वय वाढण्यापासून रोखते. सदर गोळीच्या निर्मितीसाठी अमेरिकन सेना मेट्रो इंटरनॅशनल बायोकेम या बायोटेक लॅबसोबत काम करणार आहे.

अमेरिकन लष्कराने तयार केलेल्या गोळीमुळे जवानाचे वृद्धत्व टाळता येणार आहे. त्याचबरोबर त्यांचा शारीरिक आणि मानसिक फिटनेस वाढणार असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. त्यांची कार्यक्षमता वाढणार असून थकवा कायमचा दूर होऊ शकणार आहे. शरीरात एनजाईम वाढणार असल्याने संबंधित व्यक्ती तरुणाप्रमाणे काम करू शकणार असल्याचेही अमेरिकेच्या सायंटिफिक मासिकात म्हटले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: