आम्ही दलित पँथरचे कार्यकर्ते आहोत -नाना पटोले

पुणे: नामदेव दादांनी जे 49 वर्षांपूर्वी जे बीज पेरलंय, ते आज एक वटवृक्ष झालं आहे, व त्यांच स्वप्न पूर्ण करणे हे आपले यशवंतराव व संपूर्ण दलित पँथरचे काम आहे. मलिका ताई तुमचा भाऊ म्हणून सांगतो पँथर आपल्या पाठी सक्षमपणे उभा राहील आम्ही दलित पँथरचे कार्यकर्ते आहोत असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

बंडखोर महाकवी व दलित पँथर संस्थापक अध्यक्ष लोकनेते पद्मश्री नामदेव ढसाळ यांची क्रांतिकारी संघर्ष करणारी दलित पँथर 49व्या वर्षात पदार्पण करत असताना पुणे शहरात घोरपडी येथे मोठ्या उत्साहात वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी पटोले बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर दलित पँथर राष्ट्रीय अध्यक्षा मलिका ढसाळ, काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, राज्यमंत्री विश्वजीत कदम, माजी आमदार उल्हास पवार, आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, अभय छाजेड आदी उपस्थित होते व सर्व प्रमुख पाहुण्यांना पँथररत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

राज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचे स्वप्न जसे मूठभर मावळ्यांनी पुढे न्हेले, तसेच पद्मश्री नामदेव दादांचे स्वप्न त्यांचा मावळा यशवंत नडगम पुढे घेऊन चालत आहे. आणि मी दलित पँथरचा एक कार्यकर्ता आहे हे मी सांगतो!”

कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय कार्याध्यक्ष व अध्यक्ष महाराष्ट्र राज्य दलित पँथर यशवंत नडगम,
संतोष गायकवाड, श्रीकांत दलोणारे यांनी केले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: