प्रशासकांच्या उपस्थितीत मार्केट यार्डातील फळ विभागात कारवाई

पुणे:मार्केट यार्डातील फळ विभागात प्रशासकांच्या उपस्थितीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. मोकळ्या जागेत ठेवलेले 230 क्रेट जप्त केले. दोन आडत्यांकडून प्रत्येकी 2 हजार 360 रुपये आणि एका आडत्याकडून 1 हजार 180 रुपये दंड वसुल करण्यात आला.

प्रशासक मधुकांत गरड, फळ विभागप्रमुख बाबासाहेब बिबवे, भाजीपाला विभागप्रमुख दत्तात्रय कळमकर यांच्या उपस्थितीत गटप्रमुख बाळासाहेब कोंडे यांनी ही कारवाई केली.
मार्केट यार्डात रविवारी इतर दिवसांच्या दिवशी खरेदीस गर्दी होत असते. या परिस्थितीत प्रशासक यांनी आज हजेरी लावली. त्यांच्या समोर अधिकाऱ्यांनी कारवाई केली. एका आडत्याने मोकळ्या जागेत लावलेले क्रेट जप्त करण्यात आले. गाळ्यापासून पंधरा फुटाच्या आत व्यवसाय करण्यास व्यापाऱ्यांना परवानगी आहे. या नियमाचा भंग केल्याप्रकरणी आडत्यांवर कारवाई करण्यात आली. पाच हजार 950 रुपये दंड वसुल करण्यात आला.

Leave a Reply

%d bloggers like this: