पावसाळी अधिवेशन – भाजपच्या ‘या’ 12 आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन

मुंबई : विधिमंडळाचे  दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन आज पासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सभागृहात अध्यक्षांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपच्या बारा आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

संजय कुटे, आशिष शेलार, जयकुमार रावल, गिरीश महाजन अभिमन्यू पवार, हरिश पिंपळे, राम सातपुते, जयकुमार रावल, पराग अळवणी, नारायणे कुचे, बंटी बागडिया, योगेश सागर या बारा आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

अधिवेशन सुरू झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाचा प्रस्ताव मांडला. परंतु विरोधकांना बोलू दिलं जात नाही असं म्हणज भाजपच्या आमदारांनी आक्षेप घेतला. यावेळी आमदारांनी तालिका अध्यक्षांचा माईक ओढला. तर काहींनी थेट अध्यक्षांनाच शिवीगाळ केली. परिणामी या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं.

अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी या गदारोळाचा  व्हिडीओ ट्वीट करुन भाजपच्या आमदारांना अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्याचा आरोप केलाय. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावले असून, संबधीत निलंबीत आमदारांचे निलंबन मागे घ्यावे यासाठी राज्यपालांकडे धाव घेतली आहे.

दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळात ओबीसी आरक्षणा संदर्भातला ठराव संमत करण्यात आला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: