शिक्षण संस्थांनी व शाळांनी कमीत कमी ३०-४०% फि माफ करावी – मंदार जोशी

पुणे: ज्या महाराष्ट्र भुमित कर्मवीर भाऊराव पाटलांनी मुलांनी शिकावं यासाठी बायकोचे मंगळसूत्र मोडले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर यांनी आपलं संपूर्ण जीवन मुला मुलींनी शिकावं म्हणुन समाजासाठी वाहिले. अशा महाराष्ट्रामध्ये, मध्यमवर्गीय गरीब जे जागतिक कोरोना महामारी मुळे आधीच त्रस्त आहेत. अशातच  शाळांनी पूर्ण फि भरावी असा पालकांना तगादा लावला आहे. शाळांमध्ये या वर्षी कल्चरल ऍक्टिव्हिटी, स्पोर्टस ऍक्टिव्हिटी, मुलांना शाळेत देण्यात येणारे डब्बे या कोणत्याच गोष्टी झालेल्या नाहीयेत तर त्याचे पैसे पालकांनी का द्यावे? आधीच करणामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांना नोकऱ्या नाहीयेत आणि त्यातच जर पालकांनी फी भरली नाही, तर शिक्षण संस्था व शाळा ऑनलाइन शिक्षण बंद करीत आहेत व त्यांना रिझल्ट न देणे, वह्या पुस्तके न देणे, अशा प्रकारच्या धमक्या शिक्षण संस्था देत आहेत. तरी सर्व शिक्षण संस्थांनी व शाळांनी कमीत कमी ३०-४०% फि माफ करावी अशी मागणी पुण्यातील पत्रकार परिषदेत मंदार जोशी राष्ट्रीय निमंत्रक आठवले गट यांनी केली.

या पत्रकार परिषदेला प्रशांत गांधी राष्ट्रवादी सरचिटणीस पुणे शहर ,अभिजित महामुनी युवक काँग्रेस संघटक पुणे शहर, प्रवेश तांबोळी युवक काँग्रेस पुणे शहर प्रदेश चिटणीस व्यापारी आघाडी, भाजपा आकाश शिंदे वकील, सनी रणदिवे सरचिटणीस युवक काँग्रेस पुणे ,संतोष पवार सामाजिक कार्यकर्ते, वैशाली बाफना सीकॉम डायरेक्टर पुणे शहर ,संतोष चव्हाण जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, मयूर उत्तेकर महाराष्ट्र नागरिक कृती समितीचे अध्यक्ष परेश हुंबे, गुलाबराव ताठे मित्र मंडळ ट्रस्ट अध्यक्ष अजिंक्य पालकर , वंदे मातरम संघटना प्रदेशाध्यक्ष सचिन जामगे  उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत विविध शाळां च्या पालकांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत तरी सर्वांनी आपल्या स्वतःच्या हक्कासाठी एकत्रित यावे असे आवाहन मंदार जोशी यांनी केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: