भटक्या -विमुक्त मधील गरीब लोकांना वसतिगृहे व आश्रम बांधून द्या; सुषमा अंधारे यांची शरद पवार यांच्या कडे मागणी


पुणे: भटक्या -विमुक्त मधील गरीब लोकांना वसतिगृहे व आश्रम बांधून द्या अशी मागणी गणराज्य संघ च्या अध्यक्षा सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.

शनिवारी शरद पवारांच्या उपस्थितीत पुण्यात मार्केट याड येथे निसर्ग मंगल कार्यालयात गणराज्य संघ, महाराष्ट्र चे अध्यक्ष सुषमा अंधारे भटक्या विमुक्त जमातीचे सदस्य
यांच्यात बैठक झाली त्यानंतर सुषमा अंधारे यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.

सुषमा अंधारे म्हणाल्या, भटक्या – विमुक्त जमात नोमातीक ड्राईव्ह राज्य मध्ये ओळखले जातात भटकी-विमुक्त जमात हे ओबीसी म्हणून
ओळखले जात नाही. आम्हाला महा ज्योती मध्ये नेमून उपयोग नाही त्याच्यापेक्षा महा ज्योती च्या धर्तीवर एक स्वतंत्र स्वायम् पीठ  यंत्रणा उभी केली जावी ज्या काही मराठा समाजाला तुम्ही न मागता वसतिगृहे उभी करत आहात याबद्दल आमचे काही म्हणणे नाही पण महाराष्ट्रातल्या भटकी-विमुक्त मधील गरीब लोकांना वसतिगृहे व आश्रम गुहे उभी करावी अशी आमची मागणी आहे ज्या त्या ऊस तोडणी कामगारांच्या मुला-मुलींना महाराष्ट्रात वसतीगृहे  आश्रम गुहे    उभी करत आहेत तसेच भटकी-विमुक्त मधील गरीब लोकांना वसतिगृहे व आश्रम बांधून देण्यात यावी याबद्दल आजच्या बैठकीत चर्चा झाली.

पुढच्या महिन्यातील अधिवेशन झाल्यानंतर मी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब ुख्य सचिव यांच्या  अध्यक्षतेखाली 11 व 12 जुलै ला भटकी-विमुक्त जमातीचे चार पाच सदस्य उपस्थित राहून याबाबत परत बैठक घेणार आहोत असे शरद पवार यांनी आम्हाला बैठकीत सांगितले या बैठकीत आपण हा प्रश्न सोडवून टाकू असे आश्वासन दिलं आहे.
1)अगरवाल टास्क फोर्स सारखा आयोग नव्याने नेमून त्या आधारे
भ ज ब प्रवर्गाचा सामाजिक आर्थिक संशोधन अभ्यास व्हावा.

२)  मूळ भटक्यांना क्रीमिलयेर मधून वागळण्या संदर्भात 2014 ला सादर अहवाल वर निर्णय घेण्यात यावा.
हे दोन मुद्दे आज शरद पवारांनी मान्य केलेले आहेत
पण या बैठकीची  दुसरी  फेरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली हे बैठक होणार असून त्यात त्यांचा निर्णय होईल असे शरद पवार यांनी आम्हाला सांगितले असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: