Thursday, June 18, 2026
ENTERTAINMENTLatest News

महाराष्ट्रातील लसीकरण केंद्रांवर स्टार प्रवाहकडून टीव्हीची सोय

महाराष्ट्राची नंबर वाहिनी म्हणजेच स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच दर्जेदार कार्यक्रम सादर करत असते. इतकंच नाही तर मनोरंजनासोबतच वेगवेगळे उपक्रम राबवत प्रेक्षकांच्या कुटुंबाचा देखिल भाग होत असते. कोरोना काळात सुरक्षिततेसाठी केलेलं मास्कचं वाटप असो वा पडद्यामागच्या कलाकारांच्या घरी गणरायाची मूर्ती पोहोचवण्याचं काम असो स्टार प्रवाह वाहिनीने नेहमीच अश्या निरनिराळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

सध्याच्या घडीला कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी लसीकरण करण्यावर भर दिला जातो आहे. लसीकरण केंद्रावर लस घेण्याचा हा कालावधी सुखकर व्हावा आणि प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं या हेतूने स्टार प्रवाह वाहिनीच्या माध्यमातून लसीकरण केंद्रांवर टीव्हीची सोय करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील लसीकरण केंद्रांवर हा अनोखा उपक्रम राबवण्यात येत असून स्टार प्रवाहवरील कार्यक्रमांचा जनतेला आस्वाद घ्यायला मिळत आहे. या अनोख्या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद मिळत असून लसीकरण कालावधी सुखकर होत असल्याच्या प्रतिक्रिया मिळत आहेत.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading