Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRA

दूध दरवाढीसाठी शेतकरी एकटले
धवलक्रांती संघर्ष या आंदोलनाला प्रतिसाद

पुणे: दुधाला एफआरपीप्रमाणे दर देण्याच्या मागणीसाठी रविवारी तारीख नगर पुणे महाडा सोलापूर औरंगाबाद सांगली जालना अकोला जिल्ह्यात ठिकाणी शेतकऱ्यांनी शहराकडे जाणारा दुधाचा पुरवठा बंद करून असंतोष व्यक्त केला दरम्यान सरकारने शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करताना गाईच्या दुधासाठी ते 40 रुपये प्रति लिटर व म्हशीच्या दुधासाठी 62रुपये प्रति लिटर दर जाहीर करण्याची मागणी केली.

फोरम ऑफ इटलेक्युसलस अध्यक्ष सतीश देशमुख यांनी दुधाला कायद्याचे संरक्षण व इतर मागण्यासाठी धवलक्रांती संघर्षाच्या माध्यमातून आंदोलन करण्याचे आवाहन केले होते
शेतकऱ्यांनी शहराकडे जाणारा दूधपुरवठा बंद करा संकलन केंद्रात दूध देऊ नका असे आवाहन त्यांनी केले होते त्या आव्हानाला नगरमध्ये 25 ठिकाणी एकाच वेळी दूध ओतून आंदोलन करण्यात आले.
माढा येथे सुनील केदार यांच्या प्रतिमा चौक पुतळ्याला अभिषेक घालण्यात आला मालेगाव येथे ऊस दरवाढीसाठी शासनाचा निषेध करून चारशे लिटर दूध वाटप करण्यात आले नगरमध्ये निघोज सांबळ वीर शेवगाव तालुक्यातील हादगाव खुलताबाद मध्ये दूध ओतून काही ठिकाणी देवीला अभिषेक घालून मोफत दूध वाटप करून असंतोष व्यक्त केला दरवाढीसाठी संघर्ष सुरूच राहील
दूध दरवाढीसाठी संघर्ष सुरूच राहील.

फोरमचे अध्यक्ष सतीश देशमुख म्हणाले मला चांगला दर मिळण्यासाठी धवलक्रांती संघर्ष अभियान सुरू केले आहे त्या अंतर्गत शहरातील दूध पुरवठा थांबवण्याचे आवाहन केले होते त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला दुधाची मलई काही ठराविक लोक खात आहेत शेतकऱ्यांच्या हाताला काही मिळत नाही म्हणून हा संघर्ष करण्याची वेळ आली आहे यापुढेही हा संघर्ष सुरूच ठेवणार आहोत. असे सतीश देशमुख म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading