fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

फेडरल मोगल आनंद सीलिंग्स इंडिया लि. तर्फे सुखकर्ता हॉस्पिटलला ऑक्सिजन कॉन्संन्ट्रेटर भेट

पुणे : फेडरल मोगल आनंद सीलिंग्स इंडिया लि. कंपनीने आपल्या सीएसआर उपक्रमांतर्गत सुखकर्ता हॉस्पिटलला दोन ऑक्सिजन कॉन्संन्ट्रेटर आणि दोन बीपप मशीन भेट दिले.
कोविड 19 काळात सुखकर्ता हॉस्पिटलने आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या रुग्णांवर माफक दरात उपचार केले आहेत. याची दखल घेत फेडरल मोगल आनंद सीलिंग्स इंडिया लि. कंपनीने आपल्या सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून या हॉस्पिटलला ऑक्सिजन कॉन्संन्ट्रेटर आणि बीपप मशीन भेट दिले. कंपनी नेहमीच गरजू संस्थांना मदत करीत आली आहे.

यावेळी प्लांट मॅनेजर कपिल अरोरा, इएचएस मॅनेजर विलास वाघमारे, एचआर असिस्टंट मॅनेजर रोहिणी चौगुले, सुखकर्ता हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुमित पाटील, डॉ. नम्रता पाटील, डॉ. वैभव जाहिरव, हनुमंत कड, बाळासाहेब कड, भरत बिरदवडे, दिनेश कड आदी मान्यवर उपस्थित होते.

सुखकर्ता हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुमित पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले, की ऑक्सिजन पातळी कमी झालेल्या कोरोनाच्या गंभीर रुग्णांना या उपकरणांचा उपयोग होणार आहे. रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत, तसेच त्यांना ऑक्सिजन वेळेत मिळावा, यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची गरज आहे. या उपकरणांची उपलब्धता मर्यादित असल्यामुळे तसेच ही उपकरणे महागडी असल्यामुळे अनेकांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करणे शक्य होत नाही. ग्रामीण भागात ऑक्सिजन तुटवडा होऊ नये. यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून, तसेच अचानकपणे गंभीर होणाऱ्या किंवा ऑक्सिजनची आवश्यकता भासणाऱ्या रुग्णांना तातडीने उपचार पुरवण्याच्या दृष्टीने या ऑक्सिजन कॉन्संन्ट्रेटरचा उपयोग करता येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading