Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

रोटरी क्लबचा ‘ग्रीन अर्थ ड्राईव्ह’

पुणे : रोटरी च्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकालाचे नवे वर्ष जुलै पासून सुरु झाले असून रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या विभाग क्रमांक २५ तर्फे १ जुलै रोजी ‘ग्रीन अर्थ ड्राईव्ह ‘ ही वृक्षारोपणाची मोहीम आयोजित करण्यात आली.

१ जुलै रोजी सकाळी ७ वाजता बेसिक डोअर्स फार्म्स,खोपी (खेड शिवापूर ) येथे ही मोहीम सुरु झाली. २२० झाडे लावण्यात आली.

प्रांतपाल पंकज शहा , प्रिया शहा,रोटरीच्या पर्यावरण विभागाचे संचालक समीर रूपानी ,रोटरीचे जिल्हा सचिव जिग्नेश पंडया ,जिल्हा संचालक क्रांती शहा,सह प्रांतपाल मुकेश गुप्ता, सरपंच तुषार कांबळे यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ झाला.

रोटरी विभाग क्रमांक २५ मधील ५ क्लब चे नूतन अध्यक्ष सचिन परमार( रोटरी क्लब ऑफ पुणे कँप ) ,मनीषा कोनकर (रोटरी क्लब ऑफ पुना नॉर्थ ) ,किरण राव ( रोटरी क्लब ऑफ पुणे स्पोर्टस् सिटी ),रत्नाकर शेट्टी (रोटरी क्लब ऑफ पुणे कोरेगाव पार्क ) ,पवन जोशी (रोटरी क्लब ऑफ पुणे डायमंड ) यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले . गिरीश कोनकर तसेच उपसरपंच सनी शिवरकर, माजी सरपंच सुनील साबळे, गणेश मारणे ( अध्यक्ष,शिवतेज मित्र मंडळ ) यांच्यासह ग्रामस्थ या उपक्रमात सहभागी झाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading