Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

1 जुलै पासून धावणार पुणे- सोलापूर हुतात्मा सुपरफास्ट एक्सप्रेस

पुणे : विभागातील प्रवाशांच्या मागणीनुसार त्यांच्या सुविधा खातर मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस गुरुवार दि. १ जुलैपासून आठवड्यातील पाच दिवस धावणार आहे. या गाडीचे सर्व कोचेस आरक्षित असणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

सोलापूर-पूणे सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस गाडी क्र. 01158 ही गुरुवार दि. १ जुलैपासून पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे. सदरची गाडी सोलापूर स्थानकावरून आठवड्यातून पाच दिवस (सोमवार, ,मंगळवार, बुधवार, गुरूवार आणि शुक्रवार ) रोजी सकाळी 06.30 वाजता सुटेल आणि पुढील स्थानक कुर्डुवाडी आगमन सकाळी 07.17 प्रस्थान 07.20, दौंड स्थानकावर आगमन सकाळी 09.08 प्रस्थान 09.10 आणि पूणे स्थानकावर सकाळी 10.30 वाजता पोहचेल.

पूणे- सोलापूर सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस गाडी क्र. 01157 ही दि. १ जुलै २०२१ पासून पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे. सदरची गाडी पूणे स्थानकावरून आठवड्यातून पाच दिवस (सोमवार, ,मंगळवार, बुधवार, गुरूवार आणि शुक्रवार ) रोजी संध्याकाळी 06.10 वाजता सुटेल आणि पुढील स्थानक दौंड आगमन रात्री 07.13 प्रस्थान 07.15, कुर्डुवाडी स्थानकावर आगमन रात्री 08.47 प्रस्थान 08.50 आणि सोलापूर स्थानकावर रात्री 10.00 वाजता पोहचणार आहे. या गाडीला २ ब्रेकयान, १३ व्दितीय श्रेणी, १ एसी चेअर कार असे एकूण १६ कोचेच असणार आहेत. तरी या गाडीचा लाभ प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading