Pune – रवींद्र बर्‍हाटेच्या पत्नीला गुन्हे शाखेने केली अटक

पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटे याच्या पत्नीला पुण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रवींद्र बर्‍हाटे फरार आहे. पोलिस त्याचा युध्दपातळीवर शोध घेत आहेत. दरम्यान, बर्‍हाटे याची पत्नी त्याच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याबाबत सखोल चौकशी आणि इतर तपासासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बर्‍हाटेच्या पत्नीला अटक केली आहे. त्याबाबत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माहिती दिली आहे..

दरम्यान, पोलिस सखोल तपास करीत असून याप्रकरणावर नंतर सविस्तर माहिती दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, बर्‍हाटेच्या पत्नीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केल्यामुळं प्रचंड खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: