आंबील ओढा – बसपा प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने यांनी घेतली बाधित कुटुंबीयांची घेतली भेट

पुणे: दांडेकर पूल आणि आंबिल ओढा येथील पुणे मनपाने झोपडपट्टी धारकांच्या झोपड्या ऐन पावसाळ्यात बेकायदेशीरपणे तोडण्याचे काम केले आहे या निमित्ताने बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वकील संदीप ताजने यांनी सर्व पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या पाठीशी बसपा शेवटपर्यंत असेल अशी ग्वाही दिली.

यावेळी बसपाचे पुणे जिल्हाध्यक्ष  हूलगेश चलवादी, प्रदेश सचिव सुदीप गायकवाड व पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दांडेकर पूल अंबिल ओढा येथे पुणे मनपा व केदार असोसिएटस या बिल्डर कडून ऐन पावसाळ्यात कोणतीही पूर्वसूचना न देता पोलीस फौजफाटा घेऊन बेकायदेशीर पण झोपड्या तोडण्याचे काम केले विशेष म्हणजे ऐन पावसाळ्यात जनतेतून विरोधात तीव्र पडसाद उमटले शासन स्तरावर या सर्व घटनेची माहिती घेऊन कारवाई स्थगित करण्यात आली होती. बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वकील संदीप ताजणे यांनी पुणे शहर दौऱ्यात पीडित कुटुंबाची भेट घेतली.

Leave a Reply

%d bloggers like this: