Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

पाच रुपयांत वडापाव : विक्रीचा नवा फंडा

पुणे: खवय्यांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळालेला वडापाव हातगाडीपासून थेट पंचतारांकित हॉटेलांच्या चकचकीत टेबलांवर पोहोचला.. अतिसामान्यांपासून उच्चभ्रूंच्या जिभेवर त्याची चव रेंगाळली.. केवळ वडापावच्या विक्रीसाठी साखळी पद्धतीची दुकाने सुरू झाली.. दोन-तीन रुपये दरापासून सुरू झालेला वडापावचा प्रवास पंधरा ते वीस रुपयांपर्यंत पोहोचला.. महागाईबरोबर त्याचे दरही वाढले, पण दहा वर्षांपूर्वीच्या दरामध्ये आजही शहरात विविध ठिकाणी वडापाव उपलब्ध करून देण्याचा फंडा काही विक्रेत्यांनी अवलंबला असून, ‘वडापाव पाच रुपये’, असे फलक पहायला मिळत आहेत.

वडा व पावची ही भन्नाट जोडी कुणी जुळविली व हा पदार्थ नेमका कुणी शोधला, याचे उत्तर कुणाकडेही नाही. मात्र, वडापावची लज्जत कशी असते, याचे उत्तर जवळजवळ सर्वाकडे असते. सर्वात लोकप्रिय ठरलेले हे अस्सल मराठमोळी ‘फास्ट फूड’ लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वानाच जवळचे वाटते. त्यामुळे हातगाडी किंवा छोटय़ा टपऱ्यांवर मिळणारा वडापाव कधी मोठमोठय़ा हॉटेलांत पोहोचला, हे कळलेच नाही. अगदी ब्रॅन्डेड वडापावही बाजारात आला. त्याचबरोबर ‘आमची कुठेही शाखा नाही’, असे म्हणत काहींनी स्वत:ची एक वेगळी चव जपत केवळ वडापाव या एकाच पदार्थावर मोठा व्यवसाय उभारला.


 वडापाव मिळत नाही, असा एकही भाग शहरात सापडणार नाही. काही जण सांगतात की, आमच्यावेळी दीड ते दोन रुपयांना वडापाव मिळत होता. पण, पुढे हा वडापाव अनेक दिवस चार ते पाच रुपयांपर्यंत स्थिरावला. अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत वडापाव पाच रुपयांनाच होता. त्यानंतर तेल, बटाटा, बेसन, इंधन आदींच्या दरात होणारी वाढ लक्षात घेता सरासरी दहा रुपयांपर्यंत वडापावची किंमत झाली. काही ठिकाणी १५ ते २० रुपयांपर्यंतही त्याची किंमत गेली. पण, आता पुन्हा वडापाव दहा वर्षांपूर्वीची किंमत धारण करतो आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात त्याचप्रमाणे उपनगरांमध्ये विविध ठिकाणी ‘वडापाव पाच रुपये’ अशा पाटय़ा झळकत आहेत. त्यामुळे संबंधित ठिकाणी खवय्यांची गर्दीही पहावयास मिळत आहे. वडापाव विक्रेत्यांमधील स्पर्धेमुळे दर कमी करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

असेच एका बिबवेवाडी येथील संत एकनाथ नगर येथे राहुल काळे व दर्शन काळे या बंधूनी वडा पाव फक्त पाच रुपयात ग्राहकांना भेटेल असा नवा व्यवसाय सुरू केला आहे.

कोराना व टाळे बंदीमुळे सगळ्यांची आर्थिक घडी कोलमडली आहे मी व माझा भाऊ आमची नोकरी सुटली आम्ही दोघेही बेरोजगार होतो आम्हाला काही काम नव्हते आम्ही दोघा भावांनी 5 रुपयात  वडा पाव विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले पुण्यात स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी व बाहेरून कामासाठी आलेले नागरिक ते सकाळी नाश्त्याचे भरपूर हाल होतात जोशी वडेवाले सम्राट वडेवाले यांच्याकडे वडापाव चे दर 10-15 रुपये आहेत. नुसता व्यवसाय करून उपयोग नसतो तो व्यवसाय
किती जणांच्या फायद्याचा आहे लोकांना तो परवडतो का हे  आज कल कुठलाही व्यवसायिक बघत नाही आता कोरोना व टाळेबंदी मुळे गोरगरिबांना स्वस्त दरात कसा वडापाव विक्री करता येईल  हे आम्हा दोघा भावांनी ठरवले. आम्ही दोघा भावांनी स्वतःहा भांडवल उभे केले हा व्यवसाय सुरू केला.
– राहुल काळे, वडापाव विक्रेता

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading