राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलच्या वतीने ‘डॉक्टर्स डे’ निमित्त डॉक्टरांचा सत्कार

पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेल वतीने ‘डॉक्टर्स डे ‘ निमित्त सेल मध्ये कार्यरत डॉक्टरांचा सत्कार आयोजित करण्यात आला.

१ जुलै रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे शहर नवीन कार्यालय येथे  हा कार्यक्रम झाला.प्रशांत जगताप(अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पुणे शहर) हे पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कोवीड काळात, पूरस्थितीत आणि मांढरदेवी दुर्घटनेत मदतकार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. पुणे शहराच्या आरोग्यासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार करण्यात आला.

डॉ सुनील जगताप,अध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पवन सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल प्रदेश सरचिटणीस, डॉ. दत्ता गायकवाड, नीता कुलकर्णी, डॉ राजेश पवार ,डॉ अजितसिंह पाटील ,डॉ संगीता खेनट ,डॉ राहुल सुर्यवंशी ,डॉ हेमंत तुसे ,डॉ शशिकांत कदम , डॉ. शंतनू जगदाळे डॉ.रणजीत निकम , डॉ.पोखरणा, डॉ. देवेंद्र संचेती, डॉ. सिध्दार्थ जाधव, डॉ. विजयसिंह पाटील, डॉ. स्नेहलता मुंडे, डॉ. राजेश साठे , डॉ. योगेश कदम, डॉ. संगीता कदम, डॉ. संगीता माने,डॉ. प्रताप ठुबे, डॉ. आनंद पाटील, डॉ. नरेंद्र खेनट, डॉ. प्रदीप उरसळ, डॉ. सचिन ढमाले, डॉ. हिरेमठ, डॉ. नितीन ढुमणे, डॉ. सुनील होनराव, डॉ. संदीप बोरकर, डॉ. मंगेश ओसवाल, डॉ. अनुपमा गायकवाड, डॉ. सविता ढमाले, डॉ. ज्योती ठुसे, डॉ. कल्पना जाधव, डॉ. शिवानी बोरकर, डॉ. नितीन पाटील, डॉ. लांडे – पाटील, डॉ. मिसाळ , डॉ. लालासाहेब गायकवाड, डॉ. अजितसिंह पाटील उपस्थित होत. डॉ. राहुल सुर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: