विक्रम गोखले आता वेबसिरीजमध्ये


स्वातंत्र्य पूर्व काळातील गांधीवादी आजोबा आणि नातवाच्या नात्यावर व आजच्या परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या ‘सताड उघड्या डोळ्यांनी’ या वेबसिरीज मधून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले ओटीटी प्ल्याटफॉर्मवर पदार्पण करीत आहेत. नवीन माध्यमांशी जुळवून घेताना आनंद होत असून लवकरच मी सुद्धा एक वेबसिरीज दिग्दर्शीत करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

‘सताड उघड्या डोळ्यांनी’ ही वेबसिरीज ‘कुणाच्या खांद्यावर’ या नाटकावर आधारित असून येत्या 1 जुलै पासून ‘द चॅनल वन’ या ओटीटी प्ल्याटफॉर्म येत आहे. याचे दिग्दर्शन प्रशांत गिरकर यांनी केले आहे. तर यामध्ये विक्रम गोखले यांसह अथर्व कर्वे, नीता दोंदे, आर.जे.केदार जोशी यांची प्रमुख भूमिका आहे.

या भूमिकेबद्दल बोलताना विक्रम गोखले म्हणाले, आभास निर्मिती म्हणजे कला. मी जसा नाही तशी भूमिका यामध्ये मला करायला मिळाली. सध्या 50 टक्के क्षमतेने थिएटर चालवणे हे कोणालाच परवडणारे नाही.  त्यामुळे लोकडाऊनच्या काळात वेबसिरीजला चांगले दिवस आले आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: