Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

पुढील आठवड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज

पुणे: राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उद्या मंगळवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील आठवड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. तर मंगळवारनंतर  राज्यभरात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. दोन ते आठ तारीख दरम्यान देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने रविवारी बहुतेक ठिकाणी हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी पेरण्यांसाठी जोरदार पावसाची अजूनही प्रतिक्षा आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सूनने विश्रांती घेतली आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात अद्यापही पेरण्या  खोळंबल्या आहेत. तर काही ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत. मात्र पावसाने ब्रेक घेतल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. आणखी काही दिवस पावसाने उघडीप घेतली तर शेतकऱ्यांची भीती वास्तवात उतरू शकते. रविवारी कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.अशी माहिती पुणे वेधशाळेच्या हवामान विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading