….ही मोदींची चूकच – विक्रम गोखले

पुणे :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर वाढत असताना केवळ वोटबँकसाठी मोदी सरकारने कुंभमेळा व बंगालच्या निवडणूक प्रचाराला परवानगी दिली. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चूकच होती. आज जी करोना परिस्थिती निर्माण झाली आहे ही त्याचीच निष्पत्ती आहे, असे स्पष्ट मत जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आज व्यक्त केले.

एका वेबसिरीजच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी एक भारतीय नागरिक म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली.

राजकारणावर भाष्य करताना ते म्हणाले, अलीकडे अनेक पक्ष उदयास येत आहेत. ज्यांना ना शेंडा ना बुडखा. गांधीजींच्या नावाने गळे काढणाऱ्यांना त्यांचं पूर्ण नाव सुद्धा सांगता येत नाही. गांधीजींना लोकांनी दैवत्व दिल पण त्यांची शिकवण विसरून गेले. आजच्या युगात गांधीजींचे विचार जगातील कोणतेही स्वातंत्र युद्धाशिवाय मिळालं नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: