प्रणव मिसाळ, सेजल धारसे, शंतनु उभे चित्रकला व  वक्तृत्व स्पर्धेचे विजेते- स्वारद फाऊंडेशन तर्फे  स्पर्धा

पुणे : स्वारद फाऊंडेशनच्या वतीने आॅनलाईन चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संस्थेच्या संस्थापिका स्वाती मोहोळ आणि प.पू. गुरूवर्य श्री ॐ कालीचरण महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी गड किल्ल्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणा-या सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांचा सन्मान देखील करण्यात आला.

चित्रकला स्पर्धेत लहान गटात प्रणव मिसाळ (प्रथम), अनुज वांजळे (द्वितीय), अन्वी बोराडे (तृतीय) यांनी पारितोषिके पटकाविली. तर, मोठया गटात सेजल धारसे, तनिषा फाळके व प्रतिक गाऊडसे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. वक्तृत्व स्पर्धेमध्ये शंतनु उभे याने प्रथम, स्वराली वासकर हिने द्वितीय व अनुष्का मोरे हिने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. पतित पावनचे प्रांत संघटक सीताराम खाडे उपस्थित होते. 

स्वाती मोहोळ म्हणाल्या, कोरोना वैश्विक महामारीच्या काळात लहान मुलांना घराबाहेर पडणे शक्य नाही. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत, स्वारद फाऊंडेशन पुणे यांच्या तर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त आॅनलाईन चित्रकला स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याद्वारे लहान मुलांमध्ये इतिहास व कलेची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

Leave a Reply

%d bloggers like this: