15 सप्टेंबर पासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
पुणे : राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये. ही बाब लक्षात घेऊन, आम्ही १५ सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याबद्दल लवकरच निर्णय जाहीर केला जाईल. अशी माहिती राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी प्रधान सचिव पी गुप्ता ,जिल्हाधिकारी राजेश देशमुख व संचालक धनराज माने उपस्थित होते. उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
उदय सामंत म्हणाले, “सध्या राज्यातील विद्यार्थी आणि पालक यांना महाविद्यालयाकडून होणार्या शुल्काच्या मागणीचा विचार करिता, त्या दृष्टीने निवृत्त न्यायाधीश खासगी संस्थासाठी एफआरए निर्णय घेणार आहेत. यासाठी विजय आचलायी हे अध्यक्ष आहेत. विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीने निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तर, व्यावसायिक अभ्यासक्रमाची सीईटी ऑगस्ट महिन्यात घेतली जाईल. मात्र जोपर्यंत बारावीचा निकाल येत नाही. तोपर्यंत सीईटीचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही.”, असे त्यांनी सांगितले.
