Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयास ‘इंडिया टुडे रँकिंग’ मध्ये बाराव्या क्रमांकाचे मानांकन

पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘इंडिया टुडे रँकिंग’मध्ये अखिल भारतीय पातळीवर उत्कृष्ठ महाविद्यालयांच्या सर्वेक्षणात बाराव्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे. खासगी महाविद्यालयांच्या यादीत नववे तर पश्चिम विभागात तिसरे मानांकन मिळाले आहे.
‘भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय ‘ (पुणे ) चे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली .

नाविन्यपूर्ण निकषांखाली केलेले हे मानांकन आहे.प्लेसमेंट विभागात चवथे नामांकन या महाविद्यालयाला मिळाले आहे.

उपलब्ध निधीतून केलेले नाविन्यपूर्ण अध्यापन,इन हाऊस स्टार्ट अप,नाविन्यपूर्ण कल्पना, उद्योजकता, तंत्रज्ञान हस्तांतर, प्रशासन, पायाभूत सुविधा, गुणवत्तापूर्ण अध्यापन, अभ्यासक्रम अशा अनेक निकषांवर देशातील महाविद्यालयांचे मानांकन करण्यात आले आहे.

डॉ आनंद भालेराव म्हणाले, उपलब्ध निधी आणि साधनामधून आम्ही मागील शैक्षणिक वर्षात नाविन्यपूर्ण कल्पना आणि स्टार्ट अप उपक्रमांना प्रोत्साहन दिले.उद्योजकता आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांना पुढे नेणारे ४४ राष्ट्रीय पातळीवरील उपक्रम आयोजित केले. कार्यशाळा,स्पर्धा,समस्या समाधान विषयक उपक्रम,बौद्धिक स्वामित्व हक्क तसेच पेटंट विषयक उपक्रम आयोजित केले.राष्ट्रीय स्तरावरील अशा १४ उपक्रमात विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रभावी प्रतिनिधित्व केले.महाविद्यालयाने २ पेटंट मिळवली,३१ पेटंट साठी अर्ज केले आणि २७ पेटंट संबंधित व्यासपीठांवर प्रकाशित झाली.

‘उद्योजकतेला वाव देणारे इन्क्युबेशन सुविधा आम्ही निर्माण केल्या.त्यासाठी भरीव निधी महाविद्यालयाने प्रयत्नपूर्वक मिळविला. महाविद्यालयाने आयोजित केलेली ‘आयडिया कॉम्पीटिशन’ देशभर गाजली.अशा सर्व सामूहिक प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याचे डॉ.आनंद भालेराव यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading