आंबील ओढा प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचा सोमवारी महापालिकेवर मोर्चा

पुणे : आंबील ओढा येथील नागरिकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता विकासक आणि पालिकेने भ्रष्ट मार्गाने हातमिळवणी करत त्यांची घरे पाडली. महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजप पक्षाला याचा जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राहुल गायकवाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी दीपक कदम, सुनील बनसोडे, दता सुरते व वंचित बहजून पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राहुल गायकवाड म्हणाले, पुणे शहरातील बिल्डर जुन्या वस्त्या पाडून मोठ्या बिल्डिंग उभारत आहेत, पण येथील नागरिकांचे पुनर्वसन सरकार व महानगरपालिका करत नाही. जर पुणे महानगरपालिकेने आंबील ओढा येथील नागरिकांचा प्रश्न मार्गी लावला नाही तर आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकराच्या उपस्थितीत मंत्रालयावर भव्य मोर्चा काढून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत निवेदन देणार.


आंबील ओढा येथे जी आमची घरे पाडण्याचा जो प्रकार घडला. आमच्या आयुष्यात काळा दिवस म्हणून आम्ही दरवर्षी पाळणार आहोत. आम्ही 60 वर्षे येथे राहत आहोत, महापालिकेने आमचे  पुनर्वसन करायला पाहिजे होते आम्ही गरीब लोक आहोत आमचे पुनर्वसन करा नंतर आमची घरे पाडा. उद्या आम्ही आमच्या घटनेचा निषेध उद्या आम्ही  करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे  उद्या 28 जून रोजी सकाळी 10 वाजता महानगरपालिके वर मोर्चा मोर्चा काढून आम्ही सत्ताधाऱ्यांना जाब विचारणार आहोत.
  – कविता जगताप, आंबील ओढा येथील रहिवासी

Leave a Reply

%d bloggers like this: