Friday, June 19, 2026
Latest NewsMAHARASHTRASportsTOP NEWS

ऑलिम्पिक स्पर्धेतील निवडीबद्दल साताऱ्याच्या प्रवीण जाधवचे पंतप्रधानांकडून कौतुक

सातारा : साताऱ्यामधील फलटण तालुक्यातील सरडे गावातील एका मजूर आईवडिलांच्या पोटी जन्मलेल्या प्रवीण जाधव याची ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. पंतप्रधान मोदींनी देखील आज आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात साताऱ्याच्या प्रवीण जाधवचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. प्रवीण जाधव हा धनुर्धर आहे. आधी क्रीडा प्रबोधिनी अमरावती मग आर्मी इन्स्टिट्यूट, पुणे, भारतीय धनुर्विद्या संघटना ते ऑलिम्पिक पर्यंतचा प्रवीणचा धनुर्विद्या खेळातील प्रवास अतिशय खडतर होता. परंतु त्याची जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आज साताऱ्यातील प्रवीणची  ऑलिम्पिकमध्ये निवड झाली आहे.

‘मन की बात’मध्ये प्रविणचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, “जर तुम्ही आमच्या प्रवीण जाधव बद्दल ऐकले  तर तुम्हाला पण वाटेल की किती कठीण संघर्षानंतर प्रवीण इथे पोहोचले आहेत. प्रवीण जाधव हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका गावात राहतात. ते तिरंदाजीतील उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांचे आईवडील मजुरी करून कुटुंब चालवतात आणि आता त्यांचा  मुलगा, आपल्या पहिल्या ऑलिंपिकसाठी टोकियोला जात आहे. ही फक्त त्यांच्या आईवडिलांसाठीच नव्हे, तर आपल्या सर्वांसाठीही अभिमानाची गोष्ट  आहे.”

पुढे पंतप्रधान म्हणाले की, “टोकियोला जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा संघर्ष आहे. या खेळाडूंना भारताचा गौरव वाढवायचा आहे. म्हणूनच मी देशवासियांना सल्ला देऊ इच्छितो, की या खेळाडूंवर आपण  कळत-नकळत दबाव आणायचा नाही तर खुल्या मनाने त्यांना पाठिंबा द्यायचा आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading