Wednesday, June 17, 2026
Latest NewsLIFESTYLE

अँटीबॉडी कॉकटेल ट्रीटमेंटच्या माध्यमातून कोविड – १९ च्या तीव्रतेत घट

पुणे : मोनोक्लोनल अँटिबॉडी उपचारांमध्ये (अँटिबॉडी कॉकटेल) कॅसिरिव्हीमॅब आणि इम्डेव्हिमॅब या दोन औषधांचा संयोग साधला जातो. सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या लक्षणांवर घरीच उपचार घेणाऱ्या (होम आयसोलेशनमध्ये) रुग्णांसाठी भारतीय औषध महानियंत्रकांनी मे महिन्यात या औषधांना मंजुरी दिली आहे. औषधांचे कॉम्बिनेशन असलेल्या मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेलचा वापर सर्वप्रथम अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ऑक्टोबर २०२० मध्ये करण्यात आला होता. या उपचाराची निष्पत्ती आशादायक होती. डॉक्टरांनी याचे वर्णन “कोविड-१९ आजारावरील पहिला खरोखरीचा उपचार” असे केले होते.

कॅसिरिव्हीमॅब आणि इम्डेव्हिमॅब ही औषधे सार्स-सीओव्ही टू स्पाइक (एस) ग्लायकोप्रोटिनवरील नॉन-ओव्हरलॅपिंग एपिटोप्सना वेगळे करतात आणि त्यांना एसीई-टू रिसेप्टर्सशी आंतरक्रिया करण्यापासून रोखतात. त्यामुळे विषाणू पेशींमध्ये प्रवेश करू शकत नाही. मग रोगप्रतिकारयंत्रणा विषाणू/अँटिबॉडी कॉम्बिनेशन दूर करते. या संयुक्त उपचारांच्या (१.२ ग्रॅम कॅसिरिव्हिमॅब आणि इम्डेव्हिमॅब) एका आयव्ही इन्फ्युजनमुळे, सौम्य ते मध्यम लक्षणे जाणवणाऱ्या व लक्षणे तीव्र होण्याचा धोका प्लासिबोच्या तुलनेत अधिक असलेल्या कोविड-१९ रुग्णांमधील, रुग्णालयात दाखल होण्याचा किंवा मृत्यूचा धोका ८० टक्क्यांपर्यंत खाली आला, असे क्लिनिकल चाचण्यांत दिसून आले आहे.

पुणे येथील कोलंबिया आशिया हॉस्पिटलमधील संसर्गजन्य विकारांचे स्पेशालिस्ट डॉ. महेश लाखे म्हणाले, “लक्षणे सुरू झाल्यानंतर ७ दिवसांच्या आत कॉकटेल औषध मिळाल्यास, लक्षणे तीव्र होण्याची शक्यता असलेल्या सुमारे ७० टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासत नाही. ही उपचारपद्धती अत्यंत प्रभावी ठरत आहे. थेट विषाणू चाचणीमध्ये सार्स-सीओव्ही-२ साठी पॉझिटिव रिपोर्ट आल्यास शक्य तेवढ्या लवकर कॅसिरिव्हीमॅब व इम्डेव्हिमॅब या औषधांचे मिश्रण एकाच इन्ट्राव्हेन्युअस इन्फ्युजनच्या माध्यमातून रुग्णाला दिले गेले पाहिजे. आम्ही आत्तापर्यंत दोन रुग्णांवर अशा प्रकारचे उपचार केले आहेत. विशेषत: अन्य औषधांशी समतोल साधून मोनोक्लोनल अँटिबॉडीज तटस्थ करणे हा एक प्रभावी दृष्टिकोन आहे. रोगाचा प्रतिबंध आणि उपचार या दोहोंसाठी हा दृष्टिकोन प्रभावी ठरू शकतो.”

“जिच्यासाठी औषधे लाभदायी ठरू शकतात अशी धोक्याखालील लोकसंख्या निश्चित करणे आणि व्हायरल लोड, सेरोलॉजी व अनुकूल निष्पत्ती प्राप्त करण्याच्या दृष्टीने अन्य संभाव्य क्लिनिकल घटक यांच्या आधारे मोनोक्लोनल अँटिबॉडीजच्या प्रभावलोपनाची (न्युट्रलायझिंग) योग्य वेळ निश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आमच्या रुग्णालयात ७० वर्षांवरील एकूण दोन रुग्णांवर, त्यांच्यातील लक्षणे तीव्र होत जाण्याच्या धोक्याचे काळजीपूर्वक विश्लेषण केल्यानंतर, लक्षणे दिसू लागल्यानंतर पहिल्या आठवड्यातच, अँटिबॉडी कॉकटेल उपचार करण्यात आले. सौम्य ते मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या पण ही लक्षणे तीव्र होण्याचा धोका असलेल्या रुग्णांना, रुग्णालयात दाखल करावे लागणे किंवा त्यांचा मृत्यू होणे यांसारखे परिणाम टाळण्यासाठी याच नियमित खबरदारीनंतर, हे उपचार दिले जातात,” असे डॉ. महेश लाखे म्हणाले.

कॉम्बिनेशन अँटिबॉडीजना असलेली संवेदनशीलता अन्य चिंताजनक स्ट्रेन्सबाबतही कायम आहे असे डेटामधून दिसून आले आहे. ग्रेट ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्नियामध्ये आढळलेल्या स्ट्रेन्सचा यामध्ये समावेश आहे. यातील काही व्‍हेरिएण्‍ट्समधील म्युटेशन्स भारतातील डबल-म्युटंट व्‍हेरिएण्‍टमध्येही दिसून आली आहेत. सध्याच्या कोविड-१९ साथीमुळे संसाधनांना मर्यादा आल्या आहेत. तरीही योग्य त्या रुग्णांवर योग्य वेळी मोनोक्लोनल अँटिबॉडीज वापरून उपचार केल्यास लक्षणे तीव्र होण्याची प्रक्रिया लांबवण्यात नक्कीच मदत होऊ शकते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading