रोटरी क्लब ऑफ पुणे मगरपट्टा सिटी द्वारे 90 हून अधिक लाभार्थ्यांना कृत्रिम पाय प्रदान

पुणे : सामाजीक कार्यत अग्रेसर असणारी रोटरी ही एक अशी संस्था आहे ज्यांची आज वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही, जगभरात, रोटरी इंटरनॅशनलने मानवतेण्या दुष्टीकोणातुन गरजूंना वेगवेगळ्या प्रकारे मदत केली आहे. पुणे शहरात, रोटरी क्लब ऑफ पुणे मगरपट्टा सिटी – आरसीपीएमसीने नवीन कोवीड प्रोटोकॉल आणि सुरक्षा उपायांसह हॉटेल कोकून येथे न्यु रोटरी इयरचा प्रतिष्ठापन सोहळा आयोजित केला होता. यावेळी आरटीएन रवी मिश्रा यांनी आरटीएन कुलदीप चरक यांच्याकडून क्लबचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी डिस्ट्रिक्ट गवर्नर इलेक्ट आरटीएन  डॉ. पंकज शहा, एजीसी येझडी, जिल्हा संचालक शितल शहा व अन्य मान्यवर उपस्थित होते.


आरसीपीएमसीने विशेषत: वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण आणि सामाजिक परिणामकारक प्रकल्प राबवले आहेत. त्यांनी अलीकडेच एक जागतिक अनुदान प्रकल्प हाती घेतला जिथे त्यांनी दिव्यांगाना कृत्रिम पाय उपलब्ध करून दिले, विशेषत: ‘गुडघ्यावरील पाय’  यात ५० हून अधिक लाभार्थींना याचा लाभ मिळाला आहे. गेल्या काही वर्षांत रोटरी ने २५० हून अधिक दिव्यांगाना अश्याच प्रकारे गुडघ्याखालील कृत्रिम पाय बसवुण देण्यात मदत केली आहे.

यावर्षी इतर ९० लाभार्थ्यांना गुडघ्यापर्यंत कृत्रिम पाय उपलब्ध करुन देण्याचे रोटरीचे उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प नोबेल हॉस्पिटलच्या सहकार्याने हाती घेण्यात आला आहे, नोबल हॉस्पिटलने आपल्या सुवीधांद्वारे आणि तज्ञांच्या मदतीने मागील प्रकल्पांना देखील पाठिंबा दिला होता. याशिवाय त्यांच्याकडे पर्यावरणा संबंधी देखील अणेक प्रकल्प आहेत, ज्यात त्यांनी शेतकर्‍यांना सिंचनासाठी सौर दिवे व सौर पंप उपलब्ध करून दिले आहेत. त्यांचा इको-फ्रेंडली प्रकल्प देखील आहे ज्यात कचरा वेगळा करणे आणि कचर्याचे व्यवस्थापन करण्याचे कार्य केले जाते. याप्रसंगी बोलताना डीजीई पंकज शहा यांनी आरसीपीएमसी ने केलेल्या कामांवर भाष्य करत चांगल्या कार्यांसाठी क्लबला प्रोत्साहन दिले आणि आगामी वर्षात देखील चांगले कार्य सुरूच ठेवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. नवीन अध्यक्ष, रवी मिश्रा यांनी क्लबच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला आणि आश्वासन दिले की आरसीपीएमसी शिक्षण आणि कौशल्य, वैद्यकीय, आरोग्यसेवा आणि सामाजिक क्षेत्रांत अनेक उपक्रम राबवेल. ते म्हणतात रोटरी समाजासाठी नि: स्वार्थ सेवेमध्ये व्यस्त आहे आणि आरसीपीएमसी वंचितांना नेहमीच मदत करेल.

Leave a Reply

%d bloggers like this: