अखिल मांजराई नागरीक कृती समितीचे विविध मागण्यासाठी जि. प. कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन


पुणे : अखिल मांजराई नगर नागरी कृती समितीने विविध मागण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आज बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. 7 जून रोजी आंदोलनास बसलेल्या नागरिकांना आज 18 दिवस झाले तरी न्याय मिळाला नाही अशी माहिती अखिल मांजराई नागरिक कृति समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळवे यांनी आज दिली.

अखिल मांजराईनगर नागरी कृती समितीने मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये ज्यांच्या वशीलाने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे त्या प्रकरणी गुन्हा दाखल करून सरपंचाचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे ग्रामसेवक लिपिक कोतवाल यांना निलंबित करावे या  मागण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर अखिल मांजराई नगर नागरी कृती समितीच्या वतीने आंदोलन सुरु केले आहे
सदर मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरु राहिल अशी देखील माहिती यावेळी देण्यात आली आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र साळवे ,सोंनबा रणपिसे हे उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: