Monday, June 22, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुढील सात दिवस फारसा पाऊस होणार नाही, पुणे वेधशाळेचा अंदाज

पुणे: अरबी समुद्राकडून येणारे वारे कमकुवत असल्याने पुढील सात दिवस फारसा पाऊस होणार नसल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. जूनच्या सुरुवातीलाच राज्यात मान्सून दणक्यात सुरु झाला. राज्यातील अनेक जिल्ह्यांना आणि गावांना पावसाने चांगलेच झोडपून काढले. तर, मुंबईची चांगलीच दाणादाण उडवून दिली. मात्र, आता गेले दोन दिवस पाऊस गायब झाला आहे. काही ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. हे चित्र पुढील आठवडाभर कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. 

मान्सूनचे वारे कमकुवत असल्यामुळे पुढील सात दिवस मध्य भारत, उत्तर पश्चिम भारत, महाराष्ट्रासह दक्षिणेतील बहुतांश राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचे पुणे हवामान विभागाने जाहीर केले आहे. तसेच कोकण, गोव्यात बर्‍याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading