Monday, June 22, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कोरोना – राज्यात शुक्रवारी १० हजार रुग्ण कोरोनामुक्त तर ९ हजार ६७७ नवीन पॉझिटिव्ह

मुंबई – राज्यात आज कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत ९ हजार ६७७ रुग्णांनी वाढ झाली आहे. तर, १० हजार १३८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी १५६ मृतांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर २ टक्क्यांवरच स्थिरावला आहे.

राज्यात आज दिवसभरात १० हजार १३८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे आजपर्यंत महाराष्ट्रात बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ५७ लाख ७२ हजार ७९९ इतका झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येपैकी ९५.९४ टक्के इतके झाले आहे. ही आरोग्य यंत्रणांसाठी आणि राज्य सरकारसाठी देखील दिलासादायक बाब ठरली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading