Sunday, June 21, 2026
PUNE

मुंबईतील ‘त्या’ तक्रारीचा ‘परांजपे स्किम्स’ शी संबंध नाही – अमित परांजपे

पुणे : परांजपे कुटुंबियांच्या मिळकतीतील हिस्स्यावरुन कुटुंबातीलच एका व्यक्तीने गैरसमजुतितून विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार दाख़ल केली होती. या संदर्भात श्रीकांत, शशांक तसेच त्यांच्या काही चुलत भावंडांनादेखील त्यांची बाजु जाणून घेण्यासाठी मुंबई येथे बोलावण्यात आले होते. तक्रारदार व्यक्तीखेरीज परांजपे क़ुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आहेत .

या प्रकरणी क़ोणासही अटक केली नसल्याचा खुलासा पोलिसांनी अगोदरच केला आहे. सदर विषय हा संपूर्णत: कौटुबिक़ मिळकतीतील हिस्सेदारी बाबतचा असून परांजपे स्किम्स या कंपनीशी व व्यवसायाशी त्याचा काहिही संबंध नाही. माझे वडील शशांक परांजपे व काका श्रीकांत परांजपे या प्राथमिक चौकशी नंतर पुण्यात परतले आहेत.

अमित परांजपे, संचालक, परांजपे स्कीम्स (कन्स्ट्रक्शन) लिमिटेड

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading