Thursday, September 3, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत ओबीसी उमेदवार देणार – देवेंद्र फडणवीस

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दोन दिवसाचेच पावसाळी अधिवेशन बोलवण्यात आले आहे. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लावण्यात आल्या आहेत. यावरून राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फड‌णवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचाच सरकारचा डाव असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजप फक्त ओबीसी उमेदवारच देईल, मग विजय किंवा पराजय जे होईल ते आम्ही पाहून घेऊ, असा आक्रमक पवित्रा फडणवीस यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं.

राज्यात एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन दोन दिवसांत गुंडाळण्यात येणार आहे. त्यातच, राज्यातील स्वराज्य संस्थेतील ओबीसींचं अतिरिक्त आरक्षण रद्द करण्यात आलेलं असतानाही अनेक ठिकाणी निवडणुका लावण्यात आल्या आहे. यावरून देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आहेत. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाल्याशिवाय राज्यात कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही, अशी भूमिका भाजप नेत्यांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. त्यानंतर मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही ओबीसीचा मुद्दा सुटल्याशिवाय निवडणुका होणार नाहीत असं जाहीर केलं होतं. मात्र, वडेट्टीवार यांनी घोषणा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या मुद्द्यावर आता भाजप अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घोषित झाल्या आहे. यात एकही जागा ओबीसींकरता राखीव राहणार नाहीत. आम्ही राज्यपालांकडे या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. आम्ही हा निर्णय केलाय की याबाबत आम्ही आंदोलन करणार आहोतच. पण सरकारचा डाव असेल की निवडणुका घ्यायच्याच. तर आम्ही या सर्व जागावर फक्त ओबीसी उमेदवार देऊ. मग जिंकलो किंवा हरलो तरी आम्हाला पर्वा नाही. त्या जागा ओबीसींसाठी आरक्षित आहेत असं समजूनच आम्ही त्या निवडणुका लढवू, अशी आक्रमक भूमिका फडणवीस यांनी स्पष्ट केलीय.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading