Friday, September 4, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कोरोना – राज्यात पुन्हा 10 हजार नवीन रुग्ण

मुंबई – राज्यात गेल्या २४ तासांत १० हजार ६६ नवे कोरोना रुग्ण वाढल े आहेत. तर, ११ हजार ३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ६ हजारांपर्यंत गेलेली रुग्णसंख्या आता पुन्हा १० हजारांवर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर, आज १६३ कोरोनाबाधित मृतांची नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५७,५३,२९० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९५.९३ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.९९ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,०१,२८,३५५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,९७,५८७ (१४.९५टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,९२,१०८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,२२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,२१,८५९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading