अभिनेत्री शबाना आझमींनाही ऑनलाईन दारू मागवण पडलं महाग

कोराना काळात मिशन बिगीन अंतर्गत दारूची होम डिलिव्हरी करण्यास सरकारने परवानगी दिली होती. सध्या महाराष्ट्रात दारूची दुकानं खुली झाली असली तरी उच्चभ्रू लोकांकडून अजूनही ऑनलाईन दारू मागवली जात आहे. अनेकांना ही ऑनलाईन दारू मागवण महाग पडलं आहे. नुकतेच अभिनेत्री शबाना आझमी यांना असाच अनुभव आला असून त्यांनी स्वत: ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

“सावधान ! माझी ऑनलाईन फसवणूक झालीय. मी गुरुवारी Living Liquidz मधून ऑनलाईन ऑर्डर दिली होती. विशेष म्हणजे मी पैसेही आधीच अॅडव्हान्समध्ये दिले होते. पण अद्याप मला डिलिव्हरी मिळालेली नाही. आता तर त्या लोकांनी माझा फोन घेणेही बंद केलं आहे”असे ट्विट शबाना आझमी यांनी केले आहे.

शबाना आझमी यांच्या ट्विटला Living Liquidz कडून रिप्लाय देण्यात आला आहे. “मॅडम, गुगलवर मद्यविक्री करणाऱ्या दुकानांचे जे नंबर दाखवले जातात ते 99 टक्के खोटे असतात. तुमची Living Liquidz कडून फसवणूक झालेली नाही तर इतर ठगबाजांनी तुमची फसवणूक केली आहे. कृपया पोलिसात तक्रार दाखल करा आणि लोकांनाही याबाबत जागृत करा, अशी प्रतिक्रिया Living Liquidz कडून देण्यात आली आहे.

दरम्यान, शबाना आझमी यांची फसवणूक करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यात मुंबई पोलीस आणि सायबर क्राईमच्या अधिकाऱ्यांना यश आलं आहे. शबाना आझमी यांनी स्वत: याबाबत ट्विट करुन माहिती दिली. मला फसवणारे अखेर सापडले आहेत. त्यांचा Living Liquidz सोबत काहीच संबंध नाही. मी मुंबई पोलीस आणि सायबर क्राईमला विनंती करते की त्यांच्यावर अशी कारवाई करा जेणेकरुन ते मोठमोठ्या कंपन्यांच्या नावाने लोकांची फसवणूक करणार नाहीत, असं शबाना आझमी म्हणाल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: