ट्रकचालकांसाठी ‘सारथी’ कोविड हेल्पलाईन, पाच भाषांत मिळणार सेवा

पुणे : अपोलो टायर्स आणि अशोक लेलँड यांच्या संयुक्तविद्यमाने ट्रकचालक समुदायासाठी ‘सारथी’ ही कोविड हेल्पलाईन सुरू केली आहे. ट्रक चालक, हेल्पर्स आणि त्यांचे कुटुंबीय यांना डोळ्यासमोर ठेवून सुरु करण्यात आलेल्या या हेल्पलाईनच्या माध्यमातून कोविड विषयक मार्गदर्शन, लसीकरण आणि अन्य आजारांसाठी नॉन-कोविड मार्गदर्शन केले जाणार आहे. देशव्यापी स्तरावर कार्यरत असणारी ही हेल्पलाईन सध्या – हिंदी, तमिळ, तेलुगु, मराठी आणि असामी या पाच भाषांत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. टेलेराड फाउंडेशन हे या हेल्पलाईन सेवेचे तांत्रिक भागीदार आहेत.

ट्रकचालकांसाठी सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ७०२८१ ०५३३३  या क्रमांकावर ही हेल्पलाईन सेवा सुरू असणार आहे. ट्रकचालक जे कोविड पॉझिटीव्ह असतील, जे गृह विलगीकरणात असतील त्यांना हेल्पलाईनवर डॉक्टरांशी संवाद साधता यईल. नॉन-कोविड रुग्णांना सारथी उपक्रमाच्या अंतर्गत डॉक्टरांशी सल्लामसलत आणि प्रिस्क्रिप्शन सेवा पुरविण्यात येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: