Saturday, September 5, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

पुढील 2 दिवस राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

पुणे : राज्यात कोकणाला झोडपून काढलेल्या पावसाचा जोर आता कमी झाला आहे. आगामी 2 दिवस कोठेही जोरदार पावसाची शक्यता नाही. हवामान विभागाने कोठेही अलर्ट दिला नाही. मात्र 2 दिवस राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे विदर्भातील चंद्रपूर,गडचिरोली गोंदिया नागपूर आदी 5 जिल्ह्यात दि. 23 आणि 24 जून रोजी मेगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.

मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
रविवार सकाळपर्यंत कोकणातील पेडणे 190, माथेरान 120, सावंतवाडी 100, दोडामार्ग, मंडणगड 90, केपे, सुधागड, पाली, वैभववाडी, वाल्पोई 80 मिमी पावसाची नोंद झाली होती.
तसेच सर्वदूर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा 110 चांदगड, लोणावळा, महाबळेश्वर 90 राधानगरी,
त्र्यंबकेश्वर 60, आजारा, गारगोटी, हर्सूल, पन्हाळा, शाहूवाडी 50, वडगाव मावळ 40 मिमी पाऊस झाला. याबरोबरच काही ठिकाणी हलका पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading