‘इम्पॅक्ट्स ऑफ रिडींग इन पँडेमिक’ विषयावरील वेबिनारला प्रतिसाद

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीमधील आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे आयोजित ‘इम्पॅक्ट्स ऑफ रिडींग इन मोनोटोनस लाईफ ऑफ पँडेमिक’ विषयावरील वेबिनारला चांगला प्रतिसाद मिळाला.अन्सार इद्रीसी यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शैला बूटवाला, ग्रंथपाल नूरजहाँ शेख, समन्वयक अमृता भाटिया, मोहसीन तांबोळी, शिल्पा तांबे तसेच विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक सहभागी झाले. साथीच्या काळात वाचनाच्या सवयीने होणारे सकारात्मक परिणाम या विषयावर या वेबिनारमध्ये चर्चा झाली. राष्ट्रीय वाचन दिवसानिमित्त हा वेबिनार आयोजित करण्यात आला होता.

Leave a Reply

%d bloggers like this: